इतरांना दोष देणे
सरकारी तिजोरीचा आणि जनतेकडून घेतलेल्या पैशांचा अपव्यय करणे
कोणताही हिशेब न देणे
काय करायचं ते करून घ्या अशी पोकळ धमकी देणे
कुणाचंही न ऐकणे
मनात येईल तेच करणे
सरकार दरबाराची कोणतीही अधिकृत आणि शासकीय माहीती लपवणे
पुरावे नष्ट करणे यातच मोदी स्वतःला धन्य मानतात.
हे सगळं करत असतांना, चालू असतांना,
करोडो शेतकरी कष्टकरी रस्त्यावर विरोधात उतरलेले असतांना
गरीब शेतकरी रस्त्यावर मरत असतांना,
कोरोना काळात लोकांचे हाल प्राण्यांपेक्षाही वाईट झाले असताना,
एखादा लोकशाही देशातला नेता एवढा हट्टी, खोटारडा, मठ्ठ, पाषाणहृदयी, मूर्ख, निर्लज्ज असू शकतो?
केवळ अंबानी अदानी त्यात सहभागी आहेत का?
मोदी एवढा बलाढ्य पहिलवान केव्हापासून झाला?
केवळ मोदी, शाह, अंबानी, अदानी, डोवल, योगी, गोदिमीडिया, टिनपाट अशिक्षित उर्मट भक्त यांना दोष देऊन चालणार आहे का?
तेवढ्याने प्रश्न सुटेल का?
जनतेला समाधान, शांती मिळेल का?
देशाची समृद्धी होईल का?
मोदी शाह जोडी लोकांचं, या देशातील लोकांचं, ज्यांनी निवडून दिले आहे त्यांचे ऐकून का घेत नाही?
मोदी शाह नेहमी त्यांना जे बोलायचं जे करायचं तेच बोलतात आणि करतात बाकीच्यांनी केवळ ऐकण्याचं आणि गुलामसारखं त्यांच्या मागेमागे चालायच, ब्र काढायचा नाही, विरोध करायचा नाही, असे का झाले?
केव्हापासून झाले?
या सगळ्या गोष्टींचा करता करविता इच्छाधारी कोण आहे?
.
जेंव्हा असे प्रश्न स्वतःच्या मनाला विचारले जातात तेंव्हा एकाच प्रश्न पुन्हा पुन्हा फिरून मनात गोंधळ घालतो खरचं मोदी चुकले का? मोदी चुकत आहेत का? मोदी शाह एवढे अपराजित आहेत का?
तर प्रश्नाचे उत्तर आहे मुळीच नाही
ते शक्यच नाही,
मोदी शाह मूर्ख नाहीत
मोदी शाह हुकूमशहा नाहीतच
मोदी शाह मठ्ठ, ढिम्म नाहीतच
मोदी शाह बलाढ्य नाहीत
मोदी शाह उर्मट नाहीत,
ते गुन्हेगार आहेत, पण ते इच्छाधारी नाहीत, ते करता करविता नाहीत, ते सर्वोच्च स्थानी नाहीत, ते म्हणजेच सर्वकाही असेही नाही.....
मोदी शाह हे केवळ प्यादे आहेत
हे दोघे कोणाच्या तरी हातातल्या बाहुल्या आहेत
त्यांच्याकडून तशी कामं करून घेतली जात आहेत
मोदी शाह अंबानी, अदानी निमित्त मात्र आहेत, त्यांच्या दोऱ्या कोणाच्यातरी हातात आहेत.
सत्तेची झिंग चढवून नशा चढवून त्यांच्याकडून कोणीतरी वेगळेच कामं करून घेत आहेत.
या जगात कोणीही सर्वशक्तिमान नाही, परंतु त्यांच्या डोक्याच्या सॉफ्टवेअर मध्ये ही प्रणाली बसवून दिली आहे की
तुम्हीच सर्वशक्तिमान आहेत
तुम्हीच करता धरता आहेत,
तुम्हीच करता करविता आहेत
तुम्हीच जगजेते आहेत
तुम्हीच या जगाचे हुकूमशहा आहेत
ई. त्या दोघांच्या डोक्यात घट्ट बसवलेले आहे.
अंबानी, अदानी, मीडिया, भक्त हे सगळे supportive, additional power, energy drink, fuel, extra care / power / shield / cover आहेत जे त्यांना त्यांच्या कामात मदत करण्यासाठी ठेवलेले आहेत.
.
रणांगणावर मुख्य योद्धे मोदी & शहा आहेत.
रथाच्या घोड्याच्या लगाम वेगळ्या शक्तीच्या हातात आहेत.
मग पुन्हा प्रश्न पडतो मोदी शहा खरंच चुकले का? चुकत आहेत का? आणि यांचा करता करविता कोण?
या प्रश्नाचे उत्तर ताबडतोब नेहमी प्रमाणे कोणताही विचार न करता वेळ वाया न घालता आपसूकच बोट / संशय RSS कडे जातो.
हे निःसंशय आहे. खरं आहे. अगदी 100℅ खरं आहे की मोदी शहाच्या रथाच्या लगाम RSS नामक संस्थेकडे आहेत. कुठे लगाम सोडायचा & कुठे भक्कम करायचा याचे सगळे POWER आरएसएस कडे आहेत.
मग, प्रश्न पुन्हा तेच
RSS चुकते का?
RSS असे का करत आहे?
RSS स्वतःला सामाजिक काम करणारी संघटना म्हणून ओळख करून देत असतांना अशी असामाजिक, अव्यवहरिक, असंवेदनशील, उर्मट, का वागते आहे?
21व्या शतकात जग पुढे जात असतांना RSS शत्रू असल्यासारखी गनिमी काव्याने, मागच्या दाराने,
छुप्या पद्धतीने, देशाच्या, भारत मातेच्या छातीत सुरा का खुपसत आहे
भारतमातेच्या सुपुत्रांचे असे हाल का करत आहे?
त्यांचा खिमा का करत आहे?
रक्ताचे पाट का वाहू देत आहे?
निर्लज्जपणे हे का होऊ देत आहे?
नागरिक अन्न, पाण्यासाठी रोजगारासाठी, दोन वेळच्या जेवणासाठी, घराच्या छपरासाठी हाल
का करत आहे?
कुठे गेला राजधर्म?
कुठे गेला हिंदुधर्म?
कुठे गेले रामायण महाभारताचे न्याय पांडित्य?
कुठे आहे भगवतगीता?
कुठे आहे रामराज्य?
कुठे आहे शबरीची उष्टी बोरे खाणारा राम?
कुठे आहे त्यागनिष्ठ हिंदूधर्माचे आचरण, परंपरा, निष्ठा, नीती, मूल्य, प्रेम, नाती, शिक्षा, शिक्षण?
कुठे आहे?
RSS एकही शद्ब उच्चारत नाही? का? RSS ला देशाशी, भारतमातेशी, हिंदुस्थान शी काही देणेघेणे आहे की नाही?
इथल्या जनतेच्या प्रती, आस्था, संबंध, प्रेम, आहे की नाही?
ज्या देशावर, समाजावर, जनतेवर राज्य करण्याचा मोह आहे, हितसंबंध आहेत त्यांच्याविषयी RSS काही बोलेल की नाही?
इथे एकाच शब्दात उत्तर आहे "नाही"
जनतेप्रति प्रेम, आस्था, सद्भाव नाही,
देशाप्रती सांगायलाच नको....
मग rss नेमकी आहे तरी कोणती संघटना?
कधीपासून उदयास आली?
कोण चालवत आहे?
पाळेमुळे काय कुठपर्यंत?
केवळ गोळवलकर, भागवत, गोडसे, सावरकर, हेडगेवार, उपाध्याय, मुखर्जी, चटर्जी, कवीश्वर, टिळक
कुलकर्णी, पंडित, पांडे, चौबे किंवा तत्सम नावे घेऊन प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे का?
देशाला शांती समृद्धी मिळणार आहे का?
.
नेमका प्रश्न काय आहे,
त्याचे नेमके उत्तर काय आहे?
नेमकं दुखतंय कुठं आणि इलाज करायचा कुठे?
या सगळ्या गडबडगोंधळात एक नागरिक म्हणून, एक शिक्षित व्यक्ती म्हणून
"माझी" काय जबादारी आहे?
"मी" काय करायला पाहिजे?
"मी" कुठे चुकलो आहे?
"माझे" कर्तव्य काय?
"माझ्याकडे" कोणते मार्ग आहेत?
"मी" कोणासाठी, कशासाठी, कुठपर्यंत, कोणाच्या विरोधात, कसे लढले पाहिजे याचा विचार केला गेला आहे का?
वरवर लढून, तातुपरता इलाज करून चालेल का?
मोदी शहाला धडा शिकवून प्रश्न मिटणार आहे का?
अर्थात या दोघांना त्यांचे कर्म धडा शिकवेलच, त्यांच्या कर्माची फळं त्यांना इथे भोगावी लागणारच, त्यांचे प्रायश्चित त्यांना घ्यावेच लागेल, त्यांचा उर्मटपणा, त्यांचा हुकूमशाही बाणा जास्त दिवस चालणार नाहीत. गरीब कष्टकरी जनतेच्या विरोधासाठी
रस्त्यावर जे खिळे ठोकले,
काटेरी तारेचे कुंपण लावले गेले,
रस्त्यावर खड्डे खोदले गेले
सशस्त्र पोलीस तैनात केले
लाठीचार्ज केला
भारतमातेच्या देशाच्या विरोधात जे मोदी शहा ने युद्ध छेडले त्याचे पाप त्यांच्या माथी मारले गेले,
त्यांचे त्यांना भोगावे लागणारच यात तिळमात्र शंका नाही..
निसर्ग नियमानुसार, हिंदू शास्राच्या नियमानुसार त्यांना त्यांचे फळ लवकरच मिळणार आहे. त्याची सुरुवात झाली आहे. प्रत्येक अहंकारी, उर्मट, भ्याकड, अशिक्षित, मूर्ख, व्यक्ती मरण जवळ आले की अश्रू लपवण्यासाठी, जनतेला घाबरवण्यासाठी विनाकारण हसत असतो, आतून घाबरलेला असतो, पण तो दाखवत नसतो
ही परिस्थिती सध्या मोदी शाह ची आहे...
त्यामुळे जास्त चिंता करायची / काळजी करायची गरज नाही. ते दोघे आतून केंव्हाच नष्ट झाले आहेत. आहे तो केवळ कळसूत्री बाहुल्यांचा खेळ चालू आहे.
हा खेळ मात्र लवकर सहजासहजी थांबणार नाही, ही मोदी शाह ची जोडी जाईल आणि पुन्हा कोणीतरी त्या जागी येईल
त्या जागी बसवले जाईल, तो / ती पुन्हा तेच खेळ करेल, तीच परिस्थिती निर्माण करेल, तोच दहशतवाद, तोच निर्लज्जपणा, तोच छुप्या पद्धतीने वार, तोच भारतमातेचे लचके तोडण्याचा डाव सुरू होईल, हे कायमस्वरूपी थांबवता येईल का आणि कसे? यावर विचार करता येईल का?
या प्रश्नाच्या मुळाशी जाता येईल का? या प्रश्नाचे उत्तर सापडेल का? केंव्हा आणि कसे? त्याची ब्लू प्रिंट तयार करता येईल का? कोण आणि कशी तयार करेल?
मोदी खरचं चुकला का?