शाहू महाराज ब्राम्हणद्वेष्टे होते का?

उत्तर : अजिबात नाही. जातिभेदाविरुद्ध लढणारा व्यक्ती एखाद्या जातीचा द्वेष करू शकेल काय? नक्कीच नाही.

मग ब्राम्हण आणि ब्राह्मणेतर असा संघर्ष का उभा राहिला?

शाहू महाराजांना समाजातील विषमता संपायची होती, 👇

जातीभेद संपवून मागासलेल्या जातींना त्यांचे सामाजिक हक्क मिळवून द्यायचे होते. ब्रिटिशांच्या काळात सर्व प्रशासनयंत्रणा ब्राम्हण समाजाच्या हातात होती कारण सरकारी नोकरी शिकलेल्याला मिळे आणि शिक्षण ही फक्त ब्राह्मणांचीच मक्तेदारी होती. शाहू महाराजांकडे राजसत्ता होती आणि 👇
सत्तेच्या जोरावर त्यांनी खंबीर पावले उचलून ही शिक्षणातली आणि प्रशासनातली ब्राह्मणांची मक्तेदारी मोडून काढली. बहुजन समाजातील मुलांनी शिक्षण घ्यावे यासाठी वसतिगृह चळवळ आणि अनेक शिक्षणविषयक कायदे / आदेश काढून शाहू महाराजांनी ब्राह्मणेतर समाजासाठी शिक्षणाची गंगा वाहती केली.👇
अगदी गावपातळीवर सुद्धा कारभारात सर्व जातींच्या लोकांना संधी मिळावी यासाठी कुलकर्णी वतन बरखास्त केले. (गावचा सगळा कारभार कुलकर्णी पाहत असत. त्यांच्या कामासाठी सरकारकडून त्यांना वतनी जमिनी मिळाल्या होत्या. जेव्हा एखादे वतन खालसा व्हायचे तेव्हा या जमिनी सुद्धा सरकारजमा व्हायच्या.)👇
शाहू महाराज कुलकर्णी वतन बरखास्त करताना कुलकर्ण्यांशी सूडबुद्धीने वागले नाहीत, उलट वतनी जमिनी सरकारजमा करून न घेता संबंधित कुलकर्णींच्या मालकीच्या करून दिल्या. आणि त्यासाठी जो कर लागणार होता तो सुद्धा माफ केला. 👇
तरीसुद्धा शाहू महाराज महाराष्ट्रातील समस्त ब्रम्हवृंदाच्या शिव्याशापाचे धनी झाले.
वेदोक्त प्रकरणामुळे आधीच ब्राम्हणवर्गाचा महाराजांवर राग होता त्यात कुलकर्णी वतन सारखी लहान लहान प्रकरणे झाली आणि महाराजांच्या हितशत्रूंनी महाराजांची प्रतिमा 'ब्राह्मणांचे कट्टर शत्रू' 👇
अशी बनवून त्यांच्यावर हल्ले चढवले. मात्र शाहू महाराजांचे शत्रुत्व ब्राम्हण जातीशी नव्हते तर कर्मठ ब्राह्मण्यवादाशी होते. न्या.रानडे, नाम. गोखले, प्रि. आगरकर या उदारमतवादी व सुधारणावादी ब्राम्हण नेत्यांविषयी शाहू महाराजांना प्रचंड आदर होता, 👇
या नेत्यांशी महाराज वेळोवेळी चर्चा करत असत, त्यांचे सल्ले घेत असत. अगदी लोकमान्य टिळकांबद्दल सुद्धा महाराजांना आदर होता, चिरोल प्रकरणात शाहू महाराजांनी छुप्या पद्धतीने टिळकांना मदत केली होती. अनेक ब्राम्हण महाराजांच्या विश्वासाचे अंमलदार व सल्लागार होते, 👇
अनेक ब्राह्मणांना महाराजांनी इनामे दिली होती. महाराजांनी प्रशासनातील ब्राह्मणांची मक्तेदारी मोडून काढली याचा अर्थ ब्राह्मणांची सरसकट हकालपट्टी केली असा अजिबात नाही. महाराजांच्या कारकिर्दीच्या शेवटी म्हणजेच १९२२ साली ९५ सरकारी अधिकाऱ्यांपैकी ३६ ब्राम्हण तर ५९ ब्राह्मणेतर होते👇
तर खाजगीच्या १५२अधिकाऱ्यांपैकी ४३ब्राम्हण आणि १०९ब्राह्मणेतर होते.शाहू महाराज जर ब्राह्मणद्वेष्टे असते तर राजसत्ता हातात असताना सरसकट सगळ्या ब्राह्मणांची हकालपट्टी करणे सहज शक्य होते.पण शाहू महाराज कोणाशीही द्वेषभावनेने वागले नाहीत. प्रशासनातील अनेक प्रमुख पदांवर ब्राम्हण होते.👇
कला, समाजकारण, पत्रकारिता, उद्योग इत्यादी क्षेत्रातील ब्राम्हण व्यक्तींना शाहू महाराजांनी सढळ हाताने आर्थिक मदत केली होती. महायुद्धाच्या काळात कच्च्या लोखंडाअभावी लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्यावर कारखाना बंद करण्याची वेळ आली तेव्हा महाराजांनी संस्थानातील जुन्या तोफा पुरवून 👇
कारखाना तगवून ठेवला. श्रीखंडे आणि पडळकर नावाचे २ ब्राम्हण घोड्याच्या बागेत कामाला होते, तिथे त्यांची कुचंबणा होतेय हे लक्षात आल्यावर महाराजांनी त्यांना कारकुनी नोकरीत घेतले. स्टेट प्लिडर मल्हार गर्दे यांच्या निधनानंतर त्यांच्या ६ माणसांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा आणि 👇
२ मुलींची लग्न व्हावीत यासाठी महाराजांनी दरमहा ४० रुपये मंजूर केले. (तेव्हा शिक्षकाचा पगार १०-१२ रुपये होता.) ही झाली काही प्रातिनिधिक उदाहरणे. यावरून असेच लक्षात येते की बहुजन समाजाला सामाजिक न्याय मिळावा, त्यांचे सामाजिक हक्क मिळावेत, त्यांना समाजात बरोबरीचे स्थान मिळावे👇
यासाठी शाहू महाराज ब्राम्हणशाही विरुद्ध लढले खरे परंतु ब्राम्हण म्हणून त्यांनी कोणावर कधी अन्याय केला नाही अथवा पक्षपातीपणाने वागले नाहीत.

क्रमशः

#राजर्षी_शाहू_महाराज

#खऱ्या_स्वातंत्र्याचे_शिल्पकार

You May Also Like

One of the most successful stock trader with special focus on cash stocks and who has a very creative mind to look out for opportunities in dark times

Covering one of the most unique set ups: Extended moves & Reversal plays

Time for a 🧵 to learn the above from @iManasArora

What qualifies for an extended move?

30-40% move in just 5-6 days is one example of extended move

How Manas used this info to book


Post that the plight of the


Example 2: Booking profits when the stock is extended from 10WMA

10WMA =


Another hack to identify extended move in a stock:

Too many green days!

Read
Following @BAUDEGS I have experienced hateful and propagandist tweets time after time. I have been shocked that an academic community would be so reckless with their publications. So I did some research.
The question is:
Is this an official account for Bahcesehir Uni (Bau)?


Bahcesehir Uni, BAU has an official website
https://t.co/ztzX6uj34V which links to their social media, leading to their Twitter account @Bahcesehir

BAU’s official Twitter account


BAU has many departments, which all have separate accounts. Nowhere among them did I find @BAUDEGS
@BAUOrganization @ApplyBAU @adayBAU @BAUAlumniCenter @bahcesehirfbe @baufens @CyprusBau @bauiisbf @bauglobal @bahcesehirebe @BAUintBatumi @BAUiletisim @BAUSaglik @bauebf @TIPBAU

Nowhere among them was @BAUDEGS to find