Authors Ishwari Murudkar

7 days 30 days All time Recent Popular
दोन वर्षांपूर्वी जेव्हा मी ‘लीन इन’ हे पुस्तक वाचले होते तेव्हा मला कधीच वाटले नव्हते की ह्या पुस्तकाचा माझ्यावर कायमचा परिणाम होईल.
“खरोखर समान जग असे आहे की जेथे महिलांनी आपले अर्धे देश आणि कंपन्या आणि पुरुषांनी अर्धी घरं चालवतील. “
- शेरिल सँडबर्ग.


अध्याय वाचताना मला जाणवलं की प्रत्येक महिला जिला तिच्या आवडीनिवडींशी कोणतीही तडजोड न करता स्वत: चे करियर बनवायचे आहे, तिच्यासाठी हा manifesto आहे. या वास्तववादी पुस्तकाची लेखिका शेरिल सँडबर्ग आहे. प्रामाणिक बोलं तर मी त्यावेळी तिचं नाव कधीच ऐकले नव्हते.


काही खुलासे करणारे तथ्य शोधल्यानंतर मी तिच्या संदर्भात अधिक माहितीसाठी थोडा इंटरनेट सर्फ केलं. हार्वर्डमधून इकॉनॉमिक्सची पदवी घेतली व पदवी पूर्ण झाल्यावर तिला कॉलेजमध्ये वुमन इन इकॉनॉमिक्स नावाची एक संस्था स्थापित केली. एका वर्षासाठी वर्ल्ड बँकेत काम केले आणि कुष्ठरोगास आळा


घालण्याच्या एका कार्यक्रमाअंतर्गत त्यांनी भारतातही प्रवास केला. नंतर हार्वर्ड येथे एमबीए केले आणि वर्षभर मॅककिन्से आणि कंपनीबरोबर काम केले. माझ्यासारख्या भारतीय महिलेसाठी, तिने आपल्या पुस्तकात लिहून दिलेल्या कामाच्या ठिकाणी महिलांच्या वागणुकीच्या साध्या साध्या निरीक्षणाद्वारे

निश्चितच एक आदर्श म्हणून काम केले. मला वैयक्तिकरित्या कळले की पुस्तकात नोंदवलेल्या बर्‍याच अज्ञात, नकळत वर्तन तथ्य सत्य आहेत. त्यापैकी काहींचा समावेश आहे की महिला ज्या प्रकल्पात काम करतात त्या कोणत्याही प्रकल्पात पुढाकार अर्थात initiative घेत नाहीत,