Authors Digvijay Vibhute

7 days 30 days All time Recent Popular
#राजर्षी_विरुद्ध_लोकमान्य
#शत्रुत्व_आणि_ममत्व
गेल्या शतकातील पहिल्या दोन दशकात महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर छत्रपती शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक या दोन महापुरुषांचा उदय झाला. शाहू महाराजांना राजकीय स्वातंत्र्यापेक्षा मानवमुक्ती करणारे स्वातंत्र्य आणि 👇


सामाजिक सुधारणा जास्त महत्वाच्या वाटत होत्या तर लोकमान्य टिळकांना राजकीय स्वातंत्र्य अधिक गरजेचे वाटत होते. ही दोन्ही स्वातंत्र्ये एकमेकांस पूरक आहेत याची जाणीव या दोन्ही महापुरुषांना होती तरीही एकमेकांच्या हातात हात घालून काम करण्याऐवजी एकमेकांशी दोन हात करण्याची परिस्थिती 👇

त्यांच्यासमोर उभी राहिली हे खरंतर महाराष्ट्राचं दुर्दैव. तसं पाहिलं तर लोकमान्यांच्या मनात कोल्हापूरच्या गादीविषयी प्रचंड आदर होता. या आदरापोटीच त्यांनी व आगरकरांनी चौथ्या शिवाजी महाराजांवर होणाऱ्या अत्याचाराला 'केसरी' मधून वाचा फोडली. यात त्यांना दिवाण बर्व्यांचा रोष 👇

पत्करावा लागला आणि न्यायालयीन शिक्षाही झाली. टिळक-आगरकरांच्या 'डेक्कन एज्युकेशन सोसायटी'ला आबासाहेब घाटगे यांनी भरीव आर्थिक मदत केली तर सोसायटीचे अध्यक्षपद कोल्हापूरच्या गादीकडे आले. जेव्हा छत्रपती शाहू राज्यासनारुढ झाले तेव्हा लोकमान्यांनी त्यांचे मनापासून अभिनंदन केले. 👇

सारांश काय तर लोकमान्य आणि शाहू महाराज यांचे संबंध १९०० पर्यंत अत्यंत चांगले होते. जेव्हा वेदोक्ताचे प्रकरण पेटले तेव्हा लोकमान्यांनी हस्तक्षेप करून कोल्हापूरच्या ब्रम्हवृंदाला आवरायला हवे होते अशी शाहू महाराजांची अपेक्षा होती. मात्र लोकमान्यांनी सनातन्यांची बाजू घेतली हे 👇
#खऱ्या_स्वातंत्र्याचे_शिल्पकार यामध्ये मी शाहू महाराजांवर लिहायला सुरवात करत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जे शाहू महाराज हे शिवछत्रपतींचे वारसदार असून सुद्धा त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवला नव्हता, स्वातंत्र्य चळवळीला उघड पाठिंबा दिला नव्हता, बंडखोरी केली नव्हती 👇


तरी ते #खऱ्या_स्वातंत्र्याचे_शिल्पकार कसे काय? पहिलं म्हणजे स्वातंत्र्याचा अर्थ फक्त ब्रिटिश सत्तेपासून मुक्तता एवढाच होत नाही. कोणत्याही बंधनातून मुक्तता किंवा अन्यायकारक परिस्थितीतून सुटका असा स्वातंत्र्याचा अर्थ मी घेतो. आणि शाहू महाराजांनी अनेक स्वातंत्र्ये मिळवून दिली 👇

म्हणून ते मला #खऱ्या_स्वातंत्र्याचे_शिल्पकार वाटतात.
दुसरं म्हणजे त्यांनी उघडपणे ब्रिटिशांविरुद्ध लढा का नाही उभारला? यासाठी आपल्याला तो काळ समजून घ्यावा लागेल. व्यापार, आरमार, सैन्यबळ, विज्ञान, तंत्रज्ञान अशा प्रत्येक क्षेत्रात ब्रिटिश प्रगत होते. 👇

जगातील सर्वांत प्रगत अशा ब्रिटिशांची गाठ ज्ञान-विज्ञान यामध्ये मागासलेल्या हिंदुस्थानशी पडली. ब्रिटिशांनी सन १७५७ च्या प्लासीच्या लढाईने आपल्या साम्राज्यसत्तेची मुहूर्तमेढ रोवली आणि अवघ्या १०० वर्षांत, सन १८५७ पर्यंत, आसेतुहिमाचल साम्राज्य स्थापन केले. 👇


यापूर्वी आपल्या देशावर मुघलांनी देशील आक्रमण केले, मात्र त्यांची प्रेरणा धार्मिक व राजकीय होती. ब्रिटिश मात्र 'व्यापारी साम्राज्यवाद' घेऊन आले होते. ते आर्थिक लूट अशा अर्थनीतीने करत की आपण कधी आणि कसे लुटले गेलो हेही समजत नसे. याच साम्राज्यवादाने सुवर्णभूमी असणारा आपला देश 👇
शाहू महाराज ब्राम्हणद्वेष्टे होते का?

उत्तर : अजिबात नाही. जातिभेदाविरुद्ध लढणारा व्यक्ती एखाद्या जातीचा द्वेष करू शकेल काय? नक्कीच नाही.

मग ब्राम्हण आणि ब्राह्मणेतर असा संघर्ष का उभा राहिला?

शाहू महाराजांना समाजातील विषमता संपायची होती, 👇


जातीभेद संपवून मागासलेल्या जातींना त्यांचे सामाजिक हक्क मिळवून द्यायचे होते. ब्रिटिशांच्या काळात सर्व प्रशासनयंत्रणा ब्राम्हण समाजाच्या हातात होती कारण सरकारी नोकरी शिकलेल्याला मिळे आणि शिक्षण ही फक्त ब्राह्मणांचीच मक्तेदारी होती. शाहू महाराजांकडे राजसत्ता होती आणि 👇

सत्तेच्या जोरावर त्यांनी खंबीर पावले उचलून ही शिक्षणातली आणि प्रशासनातली ब्राह्मणांची मक्तेदारी मोडून काढली. बहुजन समाजातील मुलांनी शिक्षण घ्यावे यासाठी वसतिगृह चळवळ आणि अनेक शिक्षणविषयक कायदे / आदेश काढून शाहू महाराजांनी ब्राह्मणेतर समाजासाठी शिक्षणाची गंगा वाहती केली.👇

अगदी गावपातळीवर सुद्धा कारभारात सर्व जातींच्या लोकांना संधी मिळावी यासाठी कुलकर्णी वतन बरखास्त केले. (गावचा सगळा कारभार कुलकर्णी पाहत असत. त्यांच्या कामासाठी सरकारकडून त्यांना वतनी जमिनी मिळाल्या होत्या. जेव्हा एखादे वतन खालसा व्हायचे तेव्हा या जमिनी सुद्धा सरकारजमा व्हायच्या.)👇

शाहू महाराज कुलकर्णी वतन बरखास्त करताना कुलकर्ण्यांशी सूडबुद्धीने वागले नाहीत, उलट वतनी जमिनी सरकारजमा करून न घेता संबंधित कुलकर्णींच्या मालकीच्या करून दिल्या. आणि त्यासाठी जो कर लागणार होता तो सुद्धा माफ केला. 👇