#Thread
#मराठीभाषादिन या निमित्त आज अनेकांच्या शुभेच्छा पहिल्या, फेसबुक वर लांब लचक पोस्ट पहिल्या, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी हे गाणं आज अनेक समूहांवर फिरत आहे हेही पाहिलं पण या सगळ्यात विचार केला कि केला कि या सुंदर भाषेचा अभिमान फक्त याच दिवसापुरता मर्यादित का राहतो?
(1/18)

तुम्हाला प्रश्न पडला असेल कि मी असे का बोलत आहे ! जेव्हा जेव्हा आपण एखाद्या उपाहारगृहात जातो तेव्हा जेवण झाल्यावर आपल्या तोंडातून , " दादा किती झाले " च्या ऐवजी ' भैय्या, बिल कितना हुआ ? ' असेच वाक्य येते.
मग तोही व्यक्ती जो मराठीच असेल तो म्हणतो ' भैय्या ४०० हुए,५०० हुए...." आणि असं करत करत आपणच आपल्या भाषेला कळतनकळत पणे डावलतो. कॉलेज मध्ये एक वेगळीच सवय विद्यार्थ्यांना लागली आहे. एखाद्या कार्यक्रमादिवशी मस्त कुर्ता पायजमा कोल्हापुरी चप्पल घालून जायचं,
मात्र चार चौघांमध्ये COOL दिसण्यासाठी म्हणून अस्खलितपणे अशुद्ध का होईना पण हिंदी झाडायची. उदा : - ' मेने तेको कहा था ना, वो बंदा गलत काम कर रहा '. म्हणजे धड हिंदी पण नीट नाही आणि मराठीचा तर विषयच नाही.
मॉल मध्ये गेल्यावर काय होतं देव जाणे. इंग्रजी येत नसेल तरीही तिथल्या विक्रेत्याला शर्ट किंवा पॅन्ट ची किंमत विचारतात , " WHAT COST IS THIS PANT " ? इथे सुद्धा तसंच, धड इंग्रजी नाही आणि पुन्हा एकदा मराठीचा विषयच नाही.
मॅकडॉनल्ड्स, KFC किंवा अश्या छान आणि महागड्या हॉटेलात गेल्यावर कोण मराठी, कसली मराठी ? अरे त्यांना मराठी समजते तरी का रे ? आणि मग आपणच आपल्या भाषेला विनाशाच्या दरी मध्ये नकळत पणे ढकलत आहोत हे आपल्याला लक्षात येत नाही.
हे सगळं जाऊदे, पुस्तक वाचन तर आमच्या पिढीत ( वयोगट २० ते ३०) दुर्मिळ गोष्ट आहे. त्यातल्या त्यात काही लोकांना वाचनाची आवड असते आणि त्या ठराविक लोकांपैकी अनेक लोक हे इंग्रजी पुस्तकांकडे आकर्षित होताना मी अनेक वेळेला पाहिली आहेत.
अक्षरधारा मध्ये गेल्यावर इंग्रजी पुस्तकांच्या संचाकडे तरुण वर्ग इतका का आकर्षित झालेला असतो हा प्रश्न मला नेहमी पडतो. जेव्हा जेव्हा कोणी म्हणतो " इंग्रजी पुस्तकातील कॉमेडी म्हणजे ना, एक नंबर ".
तेव्हा माझ्या मनात हा विचार येतो, कि यांनी कधी पु ल देशपांडेंचे बटाट्याची चाळ हे पुस्तक वाचलंय का ? वाचलंय सोडा, ऐकलंय तरी का ?
मराठी मराठी करणाऱ्या किती लोकांनी प्र.के.अत्रे, पु.ल.देशपांडे, शिवाजीराव भोसले, बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर आणि अनेक अनेक उत्तम मराठी बोलणाऱ्या महान वक्त्यांची भाषणं ऐकली असतील ? भाषणं सोडा यांची नावं तरी ऐकली असतील का ?
मराठी असून इंग्रजी कविता संग्रहाकडे वळणाऱ्या लोकांना आणि त्यावरून इंग्रजी कविताच भारी असतात असं मत तयार करणार्‍या लोकांना मला विचारावेसे वाटते कि त्यांनी कधी कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, इंदिरा संत, ग.दि. माडगूळकर, सुरेश भट यांच्या कविता वाचल्या आहेत का ?
इंग्लिश मधली EDM वगैरे ऐकून, हि कला आहे, म्हणणाऱ्या लोकांनी कधी पंडित भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व अगदी आत्ताच्या काळातले राहुल देशपांडे, महेश काळे, कौशल इनामदार यांची सुंदर सुरेख मराठी गाणी ऐकली आहेत का ?
या सगळ्यात मला कोणत्याही भाषेला कमी लेखायचे नाही, प्रत्येक भाषा हि तितकीच महत्वाची आणि ती बोलता येणंही तितकीच गरजेची परंतु आपल्या मातृभाषेवर अर्थात मराठीवर आपले प्रभुत्व हवे यासाठी प्रत्येकानी प्रयत्न करणे गरजेचे !
बोलायला अनेक गोष्टी आहेत, पण शब्दमर्यादा असल्यामुळे मी इथेच थांबवतो. या लेखात मला एवढेच सांगायचे होते कि मराठी भाषेचा गौरव म्हणून हा दिवस नक्की साजरा करावा, पण मराठी भाषा जगता आली पाहिजे.
आता माझं आडनाव पांडे आहे आणि दुर्दैवाने किंवा सुदैवाने काही लोकांनी मला माझं आडनाव पाहून ' मराठी भैय्या ' हि उपाधी दिली आहे. पण ज्या ज्या ठिकाणी मी जातो, त्या त्या ठिकाणी मी संभाषणाच्या सुरवातीला मराठीचाच वापर करतो आणि अश्याच रीतीने मी माझ्या माय मराठीची सेवा करतो.
माझ्यासाठी हि भाषा पवित्र का आहे या प्रश्नाचा उत्तर एका वाक्यात द्या असं सांगितलं तर मी उत्तर देईन , " हि भाषा संत ज्ञानेश्वरांपासून, संत तुकाराम, रामदास यांनी त्यांचे विचार प्रकट करण्यासाठी वापरली आहे,
हीच भाषा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुखातून सुद्धा बाहेर पडली आहे आणि ह्याच भाषेला अधिक अधिक समृद्ध करण्यासाठी म्हणून अनेक महान व्यक्तींनी प्रचंड मोठं योगदान दिलं आहे "

पुन्हा एकदा सर्वाना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
(18/18)
या थ्रेड मध्ये काही चुका झाल्या असतील तर अवश्य कळवा! शेवटी कितीही प्रयत्न केला तरी लिहताना थोड्याफार चुका होतातच !
@ksinamdar @sumrag @deshpanderahul @vinay1011 @MarathiBrain @mi_puneri @PuneriSpeaks

More from All

You May Also Like

Master Thread of all my threads!

Hello!! 👋

• I have curated some of the best tweets from the best traders we know of.

• Making one master thread and will keep posting all my threads under this.

• Go through this for super learning/value totally free of cost! 😃

1. 7 FREE OPTION TRADING COURSES FOR


2. THE ABSOLUTE BEST 15 SCANNERS EXPERTS ARE USING

Got these scanners from the following accounts:

1. @Pathik_Trader
2. @sanjufunda
3. @sanstocktrader
4. @SouravSenguptaI
5. @Rishikesh_ADX


3. 12 TRADING SETUPS which experts are using.

These setups I found from the following 4 accounts:

1. @Pathik_Trader
2. @sourabhsiso19
3. @ITRADE191
4.


4. Curated tweets on HOW TO SELL STRADDLES.

Everything covered in this thread.
1. Management
2. How to initiate
3. When to exit straddles
4. Examples
5. Videos on