मोदि खरच चुकले का?
.
सद्या भक्त मंडळी सोडली तर सगळेच मोदी ला शिव्याशाप देत आहेत. कुठून अवदसा घरात घालून घेतली इथपर्यंत पश्चातापाची वेळ आली आहे.
महागाई
बेरोजगारी
दडपशाही कारवाई & कायदे
रोज रोज खोटं बोलणे
विरोधी लोकांवर
नेत्यांवर अनन्वित अत्याचार करणे
स्वतःचा उदो उदो करणे
इतरांना दोष देणे
सरकारी तिजोरीचा आणि जनतेकडून घेतलेल्या पैशांचा अपव्यय करणे
कोणताही हिशेब न देणे
काय करायचं ते करून घ्या अशी पोकळ धमकी देणे
कुणाचंही न ऐकणे
मनात येईल तेच करणे
सरकार दरबाराची कोणतीही अधिकृत आणि शासकीय माहीती लपवणे
पुरावे नष्ट करणे यातच मोदी स्वतःला धन्य मानतात.
हे सगळं करत असतांना, चालू असतांना,
करोडो शेतकरी कष्टकरी रस्त्यावर विरोधात उतरलेले असतांना
गरीब शेतकरी रस्त्यावर मरत असतांना,
कोरोना काळात लोकांचे हाल प्राण्यांपेक्षाही वाईट झाले असताना,
एखादा लोकशाही देशातला नेता एवढा हट्टी, खोटारडा, मठ्ठ, पाषाणहृदयी, मूर्ख, निर्लज्ज असू शकतो?
केवळ अंबानी अदानी त्यात सहभागी आहेत का?
मोदी एवढा बलाढ्य पहिलवान केव्हापासून झाला?
केवळ मोदी, शाह, अंबानी, अदानी, डोवल, योगी, गोदिमीडिया, टिनपाट अशिक्षित उर्मट भक्त यांना दोष देऊन चालणार आहे का?
तेवढ्याने प्रश्न सुटेल का?
जनतेला समाधान, शांती मिळेल का?
देशाची समृद्धी होईल का?
मोदी शाह जोडी लोकांचं, या देशातील लोकांचं, ज्यांनी निवडून दिले आहे त्यांचे ऐकून का घेत नाही?
मोदी शाह नेहमी त्यांना जे बोलायचं जे करायचं तेच बोलतात आणि करतात बाकीच्यांनी केवळ ऐकण्याचं आणि गुलामसारखं त्यांच्या मागेमागे चालायच, ब्र काढायचा नाही, विरोध करायचा नाही, असे का झाले?