BhavikaRaka Authors Pandeyji Speaks

7 days 30 days All time Recent Popular
#Thread
#मराठीभाषादिन या निमित्त आज अनेकांच्या शुभेच्छा पहिल्या, फेसबुक वर लांब लचक पोस्ट पहिल्या, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी हे गाणं आज अनेक समूहांवर फिरत आहे हेही पाहिलं पण या सगळ्यात विचार केला कि केला कि या सुंदर भाषेचा अभिमान फक्त याच दिवसापुरता मर्यादित का राहतो?
(1/18)

तुम्हाला प्रश्न पडला असेल कि मी असे का बोलत आहे ! जेव्हा जेव्हा आपण एखाद्या उपाहारगृहात जातो तेव्हा जेवण झाल्यावर आपल्या तोंडातून , " दादा किती झाले " च्या ऐवजी ' भैय्या, बिल कितना हुआ ? ' असेच वाक्य येते.

मग तोही व्यक्ती जो मराठीच असेल तो म्हणतो ' भैय्या ४०० हुए,५०० हुए...." आणि असं करत करत आपणच आपल्या भाषेला कळतनकळत पणे डावलतो. कॉलेज मध्ये एक वेगळीच सवय विद्यार्थ्यांना लागली आहे. एखाद्या कार्यक्रमादिवशी मस्त कुर्ता पायजमा कोल्हापुरी चप्पल घालून जायचं,

मात्र चार चौघांमध्ये COOL दिसण्यासाठी म्हणून अस्खलितपणे अशुद्ध का होईना पण हिंदी झाडायची. उदा : - ' मेने तेको कहा था ना, वो बंदा गलत काम कर रहा '. म्हणजे धड हिंदी पण नीट नाही आणि मराठीचा तर विषयच नाही.

मॉल मध्ये गेल्यावर काय होतं देव जाणे. इंग्रजी येत नसेल तरीही तिथल्या विक्रेत्याला शर्ट किंवा पॅन्ट ची किंमत विचारतात , " WHAT COST IS THIS PANT " ? इथे सुद्धा तसंच, धड इंग्रजी नाही आणि पुन्हा एकदा मराठीचा विषयच नाही.