Authors Alka Dhupkar

7 days 30 days All time Recent Popular
मुंबईतील प्रसिद्ध किताबखाना ला लागलेली आग आपल्या सर्वांच्या मनाला चटका लावणारी होती. त्या आगीत सुमारे 95 लाख किमतीच्या 45,000 पुस्तकांचं नुकसान झालं. एकूण नुकसान दोन कोटींच्या घरात गेलं. तरीही किताबखाना पुन्हा सुरू करण्याचं स्वप्न आहे समीर आणि अमृता सोमैया यांचं.
#Thread

त्यांनीच दहा वर्षांपूर्वी मुंबईत ही सुंदर स्पेस तयार केली.त्यांच्या जगप्रवासात विविध पुस्तकांनी त्यांना वेड लावलं.अशी एक कम्युनिटी स्पेस मुंबईतही करायची,या ध्येयाने त्यांनी किताबखानाची निर्मिती केली.अमृताचे वडील प्रसिद्ध आर्किटेक्ट जगदीश मिस्त्री यांनी किताबखाना डिझाईन केला होता.

लाईव इवेंट्स, पुस्तक वाचन, काला घोडा फेस्ट्वलचे कार्यक्रम, उत्तमोत्तम पुस्तकं, लहान मुलांसाठीचा पुस्तकांचा स्वतंत्र विभाग ही किताबखानाची सर्व खासियत कायम राहणार आहे.
सध्या तिथे रिस्टोरेशनचं काम सुरू आहे. समीर आणि अमृता यांची मी घेतलेली मुलाखत आणि बातमी शेअर करत आहे.

दोन मार्चला किताबखाना वाचकांसाठी पुन्हा सुरू करायचा समीर आणि अमृता सोमैया यांचा प्रयत्न आहे. किताबखाना कॅफे आता इनहाऊस चालवला जाईल. @JairajSinghR @KitabKhanaBooks @UpadhyayaP12

Mumbai's iconic @KitabKhanaBooks is getting ready to reopen after gutted in fire and hit by the #Lockdown
My story via @timesofindia
Read what Samir and Amrita Somaiya have to say, who created this beautiful community space in #SoBo #Mumbai #Bookstore